Praju Digital

  • Praju Digital

शेतकऱ्यांना मिळणार युनिक आयडी || काय आहे योजना? जाणून घ्या

 

शेतकऱ्यांना मिळणार युनिक आयडी || काय आहे योजना? जाणून घ्या

शेतीप्रधान भारतात शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनेच्या लाभांची ही पळवापळवी होऊ नये यासाठी आता देशातील प्रत्येक शेतकऱ्याला ‘युनिक आयडी’ देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.


Table of Contents

काय आहे योजना?

  • शेतकऱ्यांसाठीच्या योजना थेट शेतकऱ्यांनाच मिळाव्यात यासाठी डेटाबेस तयार करणे
  • यामध्ये निव्वळ शेतीवरच उपजीविका अवलंबून असलेल्या लोकांचाच समावेश असेल

सध्या कुठे सुरू आहे?

  1. आतापर्यंत मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश यांच्यासह ११ राज्यातील शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार
  2. तेलंगण, केरळ आणि पंजाब या राज्यामध्येही लवकरच ही मोहीम सुरू केली जाणार
  3. ८ कोटी शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध झाल्यानंतर योजना देशभरात सुरु केली जाणार
  4. ५.५ कोटी शेतकऱ्यांचा डेटा सध्या कृषी खात्याकडे आहे

१२ अंकी युनिक आयडी

  • आधारप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याचा १२ अंकी युनिक आयडी असेल
  • त्यातून शेतकऱ्याचे नाव, गाव, वय, शेतीचे उत्पन्न, शेती किती आदी तपशील मिळेल
  • हा आयडी शेतकऱ्याच्या बँक खात्याशी जोडला जाईल
  • या आयडीनंतर केंद्राच्या कृषी योजनांसंदर्भातील सर्व लाभ थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल

Post a Comment

0 Comments