Praju Digital

  • Praju Digital

ग्रामीण घरकुलांच स्वप्न होणार साकार, महाआवास अभियान ग्रामीण | Mahaawas abhiyan Gramin 2021

 

ग्रामीण घरकुलांच स्वप्न होणार साकार, महाआवास अभियान ग्रामीण | Mahaawas abhiyan Gramin 2021

राज्यात पुन्हा ‘महा आवास अभियान’ 

Mahaawas abhiyan Gramin 2021


राज्यात २०२० मध्ये  राबविण्यात आलेले महा आवास अभियान यशस्वी झाल्याने सन २०२१ मध्ये हि  20 नोव्हेंबर या ‘राष्ट्रीय आवास दिना’चे औचित्य साधून महा आवास अभियान 2021-22 राबविण्याचा निर्णय आज १६ नोव्हेंबर २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन शासनाने घेतला आहे. 




केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता वाढीसाठी राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर, 2021 ते 31 मार्च, 2022 या कालावधीत ‘महा आवास अभियान – ग्रामीण ( Mahaawas abhiyan Gramin 2021 ) 2021-22’ राबविण्यात

शासन निर्णय येथे पहा 

👇👇

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान - ग्रामीण 2021-22 राबविणेबाबत.


महा आवास अभियानात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत ज्यात 

भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे

  • घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे 
  • पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण 
  • ग्रामीण गवंडी प्रशिक्षण 
  • डेमो हाऊसेस 
  • विविध शासकीय योजनांशी कृती संगम 
  • बँकेचे कर्ज मेळावे घेणे 
  • बहुमजली गृहसंकुले, 
  • भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लँण्ड बँक, 
  • वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी सँण्ड बँक, 
  • वाळूला पर्यायी साहित्य वापरण्यासाठी प्रोत्साहन, 
  • किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञान, 
  • रेन वॉटर हार्वेस्टींग, 
  • सौर उर्जा साधन व नेट बिलींग इ. चा वापर  आहेत.

इ. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार

याचबरोबर या योजनेसाठी २०२१ चा केंद्र व राज्य शासनाच्या पहिला हप्ता साठी रु ९०० कोटी एवढा निधी देखील वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

शासन निर्णय येथे पहा 

सन 2021-22 या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (सर्वसाधारण) घटकांतर्गत प्राप्त केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा निधी रु. 540,56,16,000/- व राज्य समरुप हिस्सा रु.360,37,44,000/- एवढा निधी वितरीत करणेबाबत.


Post a Comment

0 Comments