सोयाबीन-कापूस उत्पादकांचा लढा आता दिल्लीत; सोयापेंड आयातीच्या चर्चेला पूर्णविराम ! |No Soyameal import
सोयाबीन-कापूस उत्पादकांचा लढा आता दिल्लीत.
सोयापेंड आयात केली जाणार नाही - केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच स्पष्टीकरण
राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व प्रश्न आता दिल्ली दरबारी पोहचले आहेत.
ज्यात राज्याचे उपमुख्यंमंत्री अजित दादा पवार यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना एक पत्र लिहून सोयापेंड आयात करू नये अशी मागणी केली आहे.
या पत्रात त्यांनी आयातीला मंजुरी दिलेल्या १२ लाख टन सोया मिल मधील उर्वरित ६ लाख सोयामिल आयात करू नये अशी मागणी केली आहे.
याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व आयातीचा प्रश्न घेऊन शेतकरी संघटने चे नेते श्री रविकांत तुपकर यांनी देखील दिल्लीत केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, याच बरोबर देशाचे माजी कृषी मंत्री श्री शरद पवार यांच्या भेटी घेतल्या आहेत.
या संदर्भात संसदेतील कार्यालयात चर्चा करून सोयापेंड आयातीचा घातकी निर्णय घेवू नका, अशी मागणी त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री पियूष गोयल यांना केली.
यासोबतच सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या महत्वपूर्ण मागण्यांवर विस्तृत चर्चा ही झाली.
यावर सोयापेंड आयातीचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नसल्याचे श्री.पियूषजी गोयल यांनी स्पष्ट केले
मात्र यासंदर्भात लेखी आदेश काढावा, अशी आग्रही मागणी यावेळी तुपकर यांनी केली जेणेकरून पोल्ट्री असोसिएशनच्या अफवांमुळे बाजारातील सोयाबीनच्या दरात घसरण होणार नाही.
याचबरोबर
■ पामतेल व खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवा
■ सोयाबीनवरील 5% GST रद्द करा
■ कापसावर निर्यातबंदी लावू नका
■ कापसावरील आयातशुल्क कमी करू नका ह्याही महत्वपूर्ण मागण्या आज त्यांच्या समोर ठेवल्या. यामागण्यांसंदर्भातही केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !