ग्रामपंचायत मासिक सभा नियम व संपूर्ण माहिती
by Arun suryawanshi
आपल्याला हे माहित आहे का ग्रामपंचायतमधील मासिक सभा नियम, ग्रामपंचायत मासिक सभा कशी असते. आपल्या गावची स्थानिक स्वराज्य संस्थेची महिन्याची मिटिंग म्हणजे ग्रामपंचायत मासिक सभा कश्याप्रकारे असते, आपल्या गावचा ग्रामपंचायतीचा कारभार सुरळितपणे चालण्यासाठी वर्षातील प्रत्येक महिन्यात १ मासिक सभा घेणे बंधनकारक असते. आपल्या गावचा विकासकाम त्याचबरोबर महिन्यातील कारभार जमा खर्च , ठराव या सर्व बाबीची विचार घेण्यासाठी मासिक सभा घेतली जाते, ती सभा नियम तसेच संपूर्ण माहिती यात आपण घेऊया…
ग्रामपंचायत अभिलेख नमुने 1 ते 33
- ग्रामपंचायत मासिक सभा नियम :-
मासिक सभा अध्यक्ष
- ग्रामपंचायत मासिक सभेचे अध्यक्ष हे पदसिद्ध सरपंच अध्यक्ष असतात
- त्यांच्या अनुउपस्थितीमध्ये उपसरपंच आणि उपसरपंच यांच्या अनुउपस्थितीमध्ये कोरम पूर्ण होत असल्यास उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते.
मासिक सभा बंधनकारक
- प्रत्येक महिन्यात किमान १ मासिक सभा घेणे बंधनकारक आहे. वर्षाला १२ असे प्रत्येक महिन्याला १ मासिक सभा सरपंच याना घेणे बंधनकारक आहे. सरपंच यांच्या अनुउपस्थित मध्ये उपसरपंच याना अधिकार आहे.
- मासिक सभेची नोटीस ग्रामपंचायत सदस्यांना किमान पूर्ण ३ दिवस अगोदर देणे आवश्यक आहे.
विशेष मासिक सभा
- विशेष मासिक सभेची नोटीस किमान १ पूर्ण दिवस देण्यात यावी.
- ग्रामपंचायत सरपंच किंवा त्यांच्या अनुउपस्थितीमध्ये उपसरपंच याना कोणत्याही वेळी विशेष मासिक सभा बोलविण्याचा अधिकार आहे.
- ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या निम्म्या किंवा त्यापेक्षा जास्त सदस्यांनी लेखी मागणी केल्यास ८ दिवसात विशेष मासिक सभा बोलवणे आवश्यक्य आहे.
मासिक सभा विषयपत्रिका
- मासिक सभा नोटीसमध्ये दिनांक, वेळ, स्थळ व विषय यांचा समावेश असावा हि विषयपत्रिका अंतिम करण्याचा अधिकार सरपंच यांना आहे.
- ३ किंवा त्यापेक्षा जास्त सदस्यांनी एखादा विषय विषय पत्रिकेत घेण्यासाठी सरपंच यांना लेखी दिले तर तो विषय मासिक सभेच्या विषय पत्रिकेत घेतला जातो.
मासिक सभा कोरम
- ग्रामपंचायत सदस्य संख्येपैकी १/२ सदस्यांची उपस्थिती सभा घेण्यास आवश्यक आहे.
- उपस्थिती मोजताना उपसरपंच सरपंच यांचा समावेश करावा लागतो. ग्रामपंचायत सदस्यसंख्ये पैकी १/२ सदस्य हजार झालेनंतर मासिक सभा घेतली जाते.
ग्रामपंचायत अभिलेख नमुने 1 ते 33
मासिक सभा ठरावाबाबत
- ग्रामपंचायत मासिक सभा ठरावाची अंलबजावणी जबाबदारी अद्यक्ष, सचिव व ग्रामपंचायतीची असते.
- एखाद्या ठरावावर एकमत न झाल्यास अध्यक्ष यांनी सादर ठरावावर आवाजी हात उंचावून किंवा गुप्त मतदान घेऊन कारवाई करायची असते.
- एखाद्या ठरावास समान मत पडल्यास अध्यक्ष याना निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो.
- एखादा ठरावात बदल किंवा तो रद्द करावयाचा असल्यास तो ठराव ३ महिन्यानंतर सभेत चर्चा करून बहुमताने बदल किंवा रद्द करण्यात येतो.
- जेव्हा एखादया मुद्द्यावर कायदेशीर विवाद होतील अशा विषयावर सचिव स्वतःचे कायदेशीर मत सभा वृतांत मध्ये नोंदवू शकतो.
- ठरावाची अमलबजावणी करणे ग्रामपंचायत अध्यक्ष, सचिव व ग्रामपंचायतीची असते.
तहकूब सभा
- सभेची गणपूर्ती वेळेत न झालेस, अर्धा तास वाट पाहूनही गणपूर्ती न झाल्यास अशी सभा तहकूब करण्यात यावी.
- ती तहकूब सभा त्यादिवसानंतर इतर कोणत्याही दिवशी घेता येते.
- तहकूब सभेची ठिकाण,वेळ,दिनांक निश्चित करून सूचना नोटीस ग्रामपंचातीच्या फलकावर लावावी,
- तहकूब सभेची नोटीस ग्रामपंचायत सदस्यांना देण्याची तरतूद नाही.
मासिक सभा न घेतलेस
- ग्रामपंचायतीची मासिक सभा महिन्यातून एखादा घेणे सरपंचांना बंधनकारक आहे.
- सरपंच यांनी यामध्ये कसूर केल्यास उपसरपंच यांनी सभा बोलवावी.
- सरपंच उपसरपंच यांनी सभा न बोलवल्यास अशी बाब सचिव यांनी गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी पुढील आदेश गटविकास अधिकार यांनी दिल्यानंतर कार्यवाही ग्रामसेवकांनी करावी.
- ग्रामपंचातीची मासिक सभा बोलविण्यास किंवा न घेतल्यास सरपंच / उपसरपंच यांनी कसूर केल्यास यांच्यावर कलम ३६ नुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
- सभा न घेण्याचे कारण पुरेसे होते कि नाही यांचे अधिकार जिलाधिकारी याना आहेत. त्याचबरोबर ग्रामसेवक / सचिव यांच्यावर सभा न बोलविल्यास कारवाई होऊ शकते.
मासिक सभेत गैरहजर
- मासिक सभेत सलग ६ महिने गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना, अध्यक्ष जिल्हापरिषद हे अपात्र ठरविण्याचे अधिकार असतात. त्याप्रकारची तक्रार आल्यास त्यांना बाजू मांडण्याची संधी देऊन जिल्हाधिकारी निर्णय देतात.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !