Praju Digital

  • Praju Digital

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच भेट, महागाई भत्त्यात 4% वाढ | central employee’s increase in dearness allowance

 


केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच भेट, महागाई भत्त्यात 4% वाढ | central employee’s increase in dearness allowance

Posted on 

central employee’s increase in dearness allowance –  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मोदी सरकारकडून मिळाली दसरा-दिवाळी भेट. केंद्र सरकारने एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना दसरा- दिवाळीची भेट दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता 38 टक्के झाला आहे. विशेष म्हणजे, महागाई भत्त्यातील ही वाढ जुलै 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या काळासाठी असणार आहे.

central employee’s increase in dearness allowance

कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना आता 38 टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे असणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 34 टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो.

मात्र, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता महागाई भत्त्यात वाढ केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या वेतनात वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. मागील तीन महिन्यांचा फरकही मिळणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दसरा-दिवाळीत मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात येते. दरम्यान, देशातील महागाई अजूनही ६ टक्क्यांवर आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न सुरू आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच भेट

केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता (डीए) व महागाई दिलासा (डीआर) यांत 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. 1 जुलै 2012 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा लाभ मिळेल. दिवाळीपूर्वीच सरकारने ही भेट दिली आहे. माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी याची माहिती दिली.

41.85 लाख केंद्रीय कर्मचारी व 69.76 लाख निवृत्तीवेतनधारक हे अनुक्रमे डीए व डीआरचे लाभधारक असतील. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 6,591.36 कोटींचा बोजा पडेल. रेल्वे कर्मचारी बोनस प्रस्तावावर काम सुरू असून, पुढील आठवड्यात तो दिला जाईल.

Post a Comment

0 Comments