गाय म्हैस बैल वासरे लम्पी आजाराने मृत पावल्यास 71,000 रू. मदत पहा शासन निर्णय | Cow, Buffalo, Bull or Calf Dies of Lumpy Disease GR

Cow, Buffalo, Bull or Calf Dies of Lumpy Disease GR – राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लम्पी चर्म रोग प्रादुर्भावामुळे शेतकरी / पशुपालक यांच्या मृत पावलेल्या पशुधनास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार अर्थसहाय्य मिळणार आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
Cow, Buffalo, Bull or Calf Dies of Lumpy Disease GR
केंद्र शासनाच्या “प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अन्वये लम्पी चर्मरोग हा अनुसूचित रोग आहे. राज्यात दि. 04.08.2022 रोजी जळगाव जिल्ह्यात प्रथमतः गोवंशीय पशुधनात विषाणूजन्य लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे. तदनंतर सद्य:स्थितीत या रोगाचा प्रादुर्भाव राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये झपाट्याने पसरलेला आहे. राज्यातील उद्भवलेला लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या आवश्यक त्या उपाययोजना याबाबत दि. 12.09.2022 रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंत्रिमंडळास वस्तुस्थिती अवगत करण्यात आलेली आहे.
लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी / पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकरी / पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे १०० टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याबाबत तसेच सदर बाबीची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे मंत्रिमंडळाने निर्देश दिलेले आहेत.
वरील वस्तुस्थिती विचारात घेता, खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे:
राज्यात गौवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेला विषाणूजन्य व सांसर्गिक लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी / पशुपालक यांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकरी / पशुपालक यांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील (महसूल व वन विभाग शासन निर्णय दि. 13.05.2015) निकषाप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून खालीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय
ज्या शेतकरी / पशुपालक यांच्याकडील पशुधन लम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडले आहे, अशा शेतकरी / पशुपालकांनी याबाबतची सूचना तात्काळ किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात / संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक तसेच ग्रामपंचायतीस द्यावयाची आहे. संबंधित शेतकरी / पशुपालक यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक / तलाठी, पोलीस पाटील तसेच दोन स्थानिक नागरीक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पशुधन मृत्यूमुखी पडल्याबाबतचा पंचनामा करून घ्यावयाचा आहे. सदर पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लम्पी चर्मरोगामुळे झाला असल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
सदरचा पंचनामा संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक यांनी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांचेकडे किंवा तालुकास्तरावर ही संस्था नसल्यास लगतच्या तालुक्याच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांचेकडे तात्काळ शक्यतो त्याच दिवशी सादर करावा.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !