Praju Digital

  • Praju Digital

‘या’ योजनेतून घ्या 50 लाखांपर्यंत कर्ज; सरकार फेडेल तुमचं व्याज | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना”

 

‘या’ योजनेतून घ्या 50 लाखांपर्यंत कर्ज; सरकार फेडेल तुमचं व्याज | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना”

          नमस्कार मित्रांनो प्राजु डिजिटल या वेबसाईटवरती सर्वांचा मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये युवकांच्या भविष्यसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी आज आपण “अण्णासाहेब पाटील कर्ज योजना किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना” याविषयी माहिती पाहणार आहोत.

Annasaheb Patil Aarthik Vikas Mahamandal Yojana : या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा सुरू असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी 5 ते 50 लाखापर्यंत कर्जपुरवठा करण्यात येत असतो. महाराष्ट्रामध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. राज्यातील बेरोजगारी बघता समाजातील बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढणं खूप गरजेचे आहे. उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचा विकास व्हावा यासाठी त्यांना आर्थिक मदत होणे खूप गरजेचे असते, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास कर्ज योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक युवकाला अतिशय सोप्या पद्धतीने व्यावसायिक कर्ज कसे मिळेल. आणि कमीत कमी व्याजदरामध्ये हे कर्ज परतफेड करता येईल यासाठी हि योजना सुरु केली आहे.

एखाद्या तरुणाला सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्याला आर्थिक मदतीची गरज असते, ही गरज भागवण्यासाठी विविध बँकेमध्ये जावे लागते. परंतु सर्वच बँका त्यांना मदत करत नाही अशा वेळेस अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत त्यांना कर्ज दिले जाऊ शकते परंतु याविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास सन २०२२-२३ साठी १०० कोटी एवढा निधी मिळणार आहे. त्यापैकी 30 कोटी निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय 8 जुलै २०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

शासन निर्णय संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत खालील तीन योजना राबवल्या जातात

  1.  वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना.
  2.  गट कर्ज व्याज परतावा योजना.
  3.  गट प्रकल्प कर्ज योजना.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : 

एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरु करणे अथवा व्यवसाय वाढीसाठी अर्ज करू शकतो.  या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यवसायाकरिता, कोणत्याही बँकेमार्फत आपल्या  व्यवसायाकरिता घेतलेल्या कर्जावरील 15 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा जास्तीत-जास्त 5 वर्षाकरिता 12 टक्क्यांच्या मर्यादेत अथवा 4.50 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा करण्यात येईल.

गट कर्ज व्याज परतावा योजना : 

या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन या योजनेमार्फत कर्ज घेऊ शकतो, दोन व्यक्तींसाठी कमाल रु. २५ लाखाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी 35 लाखाच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी 45 लाखाच्या मर्यादेवर व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लाखापर्यंतच्या उद्योग कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त 12 टक्के व्याज किंवा 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

गट प्रकल्प कर्ज योजना : 

गावातील शेतकरी असणाऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या शेतकरी उत्पादक ( किमान 10 सभासद असणाऱ्या ) गटांना (Farmers Producers Organization- FPO, कंपनी कायदा, 2013 अन्वये स्थापन झालेले) 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज रक्कम शेतीपूरक उद्योगाकरिता देण्यात येईल. या योजनेअंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी 7 वर्षाचा आहे.

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अर्ज करण्यासाठी आवश्यक बाब

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ योजना अंतर्गत एखादा उमेदवाराला जर कर्ज घ्यायचा असेल, अशा उमेदवारांनी शासनाच्या www.mahaswayam.in या अधिकृत वेबसाईटवरती आपली नोंदणी करावी. सदर वेबसाईट वरती नोंदणी केल्यानंतर आपला प्रस्ताव सादर केल्यावर सर्व अटी व शर्तीनुसार आपला अर्ज संगणकृत होतो आणि त्यानंतर त्या कागदपत्रांची छाननी करून तपासणी करून सदर अर्जदाराचा प्रस्ताव मान्य करून मंजुरीपत्र उमेदवाराला दिला जातो, तो पत्र बँकेमध्ये सादर करावे लागते.
योजनेचे नावAnnasaheb Patil Aarthik Vikas Mahamandal Loan Scheme
विभागकौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ१० लाख ते ५० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य
उद्देश्यव्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

ऑनलाईन रेजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्र 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
  • जातीचा दाखला
  • वयाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • प्रकल्प अहवाल

बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • वीज बिल
  • उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • सिबिल रिपोर्ट
  • व्यवसाय-प्रकल्प अहवाल
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

सरकारची आधिकारीक वेबसाईट

  1. https://udyog.mahaswayam.gov.in/#/home
  2. https://mahaswayamrojgar.maharashtra.gov.in/forms/NewUserRegistration.aspx

कार्यालय पत्ता 

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ.
मुंबई-४००००१

कोणत्या बँकेत हि योजना सुरु आहे 

  • अभिनव बँक 
  • कॅनरा बँक
  • महाराष्ट्र बँक
  • लोकविकास नागरी सह. बँक लि. औरंगाबाद
  • श्री. विरशैव को-ऑपरेटीव्ह बँक मर्या. कोल्हापूर
  • श्री. वारणा सहकारी बँक लिमि.वारणानगर
  • श्री. महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह को-ऑपरेटिव्ह बँक
  • कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमि.
  • श्री.आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. इचलकरंजी
  • दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमि.सिंधुदूर्ग.
  • देवगिरी नगरी सहकारी बँक, औरंगाबाद
  • द चिखली अर्बन को.ऑपरेटीव्ह बँक लिमि.चिखली,बुलढाणा
  • राजारामबापु सहकारी बँक लिमि. पेठ, सांगली
  • ठाणे जनता सहकारी बँक, ठाणे
  • दि पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मर्या, पनवेल
  • हुतात्मा सहकारी बैंक मर्या, वाळवा
  • राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑप.बँक लि.कागल
  • चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित,चंद्रपुर
  • राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजपूर
  • नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक मर्यादित,
  • यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक मर्यादित
  • शरद नागरी सहकारी बँक मर्यादित
  • लोकमंगल को-ऑप.बँक मर्यादित सोलापुर
  • प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक
  • पलूस सहकारी बँक पलूस
  • रामेश्वर को.ऑप.बँक मर्यादित
  • रेंडल सहकारी बँक मर्यादित, रेंडल
  • कुरूंदवाड अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, कुरूंदवाड
  • श्री. अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँक
  • जनता सहकारी बँक अमरावती
  • दि अमरावती मर्चट को-ऑप.बँक मर्यादित
  • अभिनव अर्बन को-ऑप. बँक मर्यादित
  • जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई
  • अरिहंत को-ऑप बँक
  • दि कराड अर्बन को-ऑप बँक
  • विदर्भ मर्चेट को-ऑप.बँक मर्यादित, हिंगणघाट
  • दिव्यंकटेश्वरा सह.बँक लि. इचलकरंजी
  • सेंट्रल को. ऑप. बँक लि. कोल्हापूर
  • सांगली अर्बन को.-आपरेटीव्ह बँक लिमि., सांगली
  • दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक
  • गोदावरी अर्बन बँक
  • श्री. नारायण गुरू को. ऑप. बँक लि.
  • श्रीकृष्ण को.ऑप.बँक लि.
  • नागपुर नागरी सहकारी बँक
  • सातार सहकारी बँक
  • दिहस्ती को.ऑप. बँक लिमी.
  • दि बुलडाणा जिल्हा केंद्रिय सह. बँक म. बुलडणा
  • अनुराधा अर्बन को-ऑप.बँक लिमी.
  • जनता सहकारी बँक लिमी. गोंदिया
  • निशीगंधा सहकारी बँक
  • महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या. लातूर
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा
  • येस बँक लि.Ves Bank LTD.)
  • रायगड सहकारी बैंक लिमिटेड
  • सारस्वत को-ऑप. बँक मर्यादित

 

( टीप :  वरील योजनेबाबत अधिकची माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासून घ्यावी तसेच संबधित योजनेची माहिती प्रत्यक्ष शासन निर्णय बघावा, वरील माहिती स्वत : तपासून बघा. )

– समाप्त –

वरील माहती कशी वाटली आवडली असेल तर नक्की इतरांना शेअर करा

Post a Comment

0 Comments