Aadhar card Security : आधार नंबर ने तुमचे बँक अकाउंट हॅ**क होऊ शकते का? UIDAI दिली ही महत्त्वाची माहिती

नमस्कार मित्रहो, “मराठी क्रिएटर्स” या महाराष्ट्रातील एकमेव खात्रीशीर संकेतस्थळावर आपलं स्वागत आहे. नवनवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या या वेबसाईटच्या इतर पोस्ट देखील नक्की वाचा. अशाच एका महत्त्वपूर्ण विषया संबंधी आजच्या या लेखामध्ये आपण माहिती घेणार आहोत.
मित्रांनो, आपल्याला सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून बँक, शाळा आणि इतर ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता भासते. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड ची गरज असते आपण त्या त्या ठिकाणी आपले आधार कार्ड किंवा त्याची प्रत देतो. परंतु आपण कधी विचार केला आहे का, की आपल्या आधार कार्ड ची सुरक्षितता ही तेवढीच महत्त्वाची असते.
आपण आपले आधार कार्ड अनेक ठिकाणी वापरत असल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची सुद्धा शक्यता वाढली आहे. म्हणून आजच्या या लेखामार्फत आपण आधार कार्ड संबंधीच्या अशाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपल्या परवानगी विना आपल्या आधार कार्डचा कोणी वापर करू शकतो का? किंवा आपल्या आधार कार्ड (Aadhar card Security) करून आपले बँक खाते कोणी हॅ**क करू शकते का? आणि यावर पर्याय म्हणून आपण काय करू शकतो? यासंबंधीची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत.
आधार कार्ड Aadhar card Security आपल्या ओळखीचे सर्वात महत्त्वाची कागदपत्र मानले जाते. आधार कार्ड शिवाय कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते अगदी बँकेमध्ये खाते उघडणे पर्यंतची सर्व कामे कठीण होऊन जातात. त्यासोबतच सर्व प्रकारच्या ऑनलाइन नोंदणीसाठी आधार क्रमांक द्यावा लागतो. आणि मग यामुळेच आपला आधार क्रमांक अनेक ठिकाणी शेअर केला जातो.
आपल्या या आधार क्रमांक मध्ये अनेक प्रकारचे तपशील असतात. त्याच्यामुळे अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असतो की, आपल्या आधार क्रमांक जर कोणाकडे असतील तर आपले बँक खाते हॅ**क होऊ शकते का? आणि याच प्रश्नाचे उत्तर आधार क्रमांक जारी करणारी प्राधिकरणाने UIDAI दिले आहे.
Aadhar card Security : आधारकार्डच्या बारा अंकांमध्ये आहे महत्त्वाची माहिती
आधार क्रमांक हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात एकदाच दिला जातो. हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्याद्वारे जारी केले जाते. आपल्या आधार कार्ड मध्ये बारा अंकी क्रमांक असतो. त्याच्यावरून ज्या व्यक्तीचे आधार कार्ड आहे त्याची संबंधित माहिती समोर येते. म्हणजेच जसे की, पत्ता, पालकांचे नाव, वय यासह अनेक माहिती उपलब्ध होते.
Aadhar card नंबर ने तुमचे खाते हॅ**क होऊ शकते का?
आपला आधार क्रमांक जर कोणाकडे असेल तर, त्या आधार क्रमांक वरून आपले बँक खाते खाते हॅ**क होऊ शकते का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर त्याचीच माहिती काही दिवसांपूर्वी UIDAI ने ट्विटर वर ट्विट करून दिली आहे. UIDAI ने ट्विटरवर ट्विट करून अशी माहिती दिली आहे की, केवळ आधार क्रमांकाच्या माहितीने बँक खाते हॅक केले जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या आधार क्रमांक कुठल्याही ठिकाणी वापरू इच्छित नसल्यास, तुम्ही व्हीआयडी किंवा मास्कड केलेले आधार वापरू शकता. हे पूर्ण वैद्य आहे आणि सर्वत्र ठिकाणी स्वीकारले जाते.
UIDAI वेळोवेळी सांगत असते की, जर तुम्ही बँकांनी दिलेला तुमचा पिन/ओटीपी कोणाबरोबर शेअर केला नाही,तर तुमचे बँक खाते सुरक्षित आहे. केवळ आधार क्रमांक बँकिंग किंवा इतर कोणत्याही सेवेसाठी वापरला जाऊ शकत नाही.
Aadhar card Security : आधार कार्ड लॉक-अनलॉक पद्धती
आपला आधार कार्ड नंबर इतरत्र शेअर होऊ नये. आणि तो इतर ठिकाणी शेअर झाला असेल आणि तुम्हाला काळजी वाटत असेल, तर त्यासाठी UIDAI ने वापर करताना आधार कार्ड नंबर ऑनलाईन लॉक करणे आणि ऑनलाईन करण्याची सुविधा दिली आहे. वर्चुअल आयडी प्रमाणीकरण आवश्यक असेल म्हणून हे नवीन “आपला आधार नंबर ब्लॉक करा आणि अनलॉक करा” हे खास वैशिष्ट्ये कोणालाही आपला आधार कार्ड नंबरचा दुरुपयोग करण्यास अनुमती देत नाही.
आपले Aadhar card अशा पद्धतीने करा लॉक आणि अनलॉक
- आपल्या आधार कार्ड सोबत असलेली लॉक-अनलॉक पद्धती वापरण्यासाठी सर्वप्रथम uidai.gov.in या वेबसाईटवर जा.
- त्यानंतर आधार सर्विसेस अंतर्गत आधार लॉक अँड अनलॉक सर्विस वर क्लिक करा.
- आता UID वर क्लिक करा.
- आता आपला बारा अंक असलेला आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार कार्ड मध्ये दिल्याप्रमाणे पूर्ण नाव टाका त्यासोबतच पिन कोड ही टाका.
- त्यानंतर खाली दिलेला कॅपचा कोड टाकावा लागेल.
- आता Send ओटीपी बटन वर क्लिक करा.
- थोड्यावेळाने तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी पासवर्ड टाकल्यानंतर आपला आधार नंबर लॉक होईल.
- आधार नंबर अनलॉक करण्यासाठी याच प्रोसेसनुसार काम करा. आणि त्यानंतर तुमचा आधार नंबर अनलॉक होईल.
तर मित्रांनो, आजची ही आधार कार्ड संबंधीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती, नोकरी, कृषी आणि सरकारी योजना संबंधीचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटच्या इतर पोस्ट नक्की वाचा.
अशाच प्रकारच्या अधिक माहितीचे अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता.
धन्यवाद..
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !