Praju Digital

  • Praju Digital

Ativrushti Nuksan Bharpai List | “या” ९ जिल्ह्यांना ७५५ कोटी रुपये वितरीत

 

Ativrushti Nuksan Bharpai List | “या” ९ जिल्ह्यांना ७५५ कोटी रुपये वितरीत

Shetkari Nuksan Bharpai 2022

Ativrushti Nuksan Bharpai List – शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम २०२२ मध्ये राज्यभरात अतिवृष्टी, पुरस्थिती, किडींचा प्रादुर्भाव तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली होती.

परंतु निकषात बसत नसल्याने अनेक शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागणार होते. पण आता अशा निकषात न बसणार्‍या शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ९ जिल्हयांसाठी ७५५ कोटींचा निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

Ativrushti Nuksan Bharpai 2022

अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.

आणि काल दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो शासन निर्णयाचा सविस्तर आढावा आणि जिल्हानिहाय मदत आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत. Ativrushti Nuksan Bharpai List

Ativrushti Nuksan Bharpai List 2022

मित्रांनो, राज्यात जून ते ऑगस्ट, २०२२ या कालावधीत विविध जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे व उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता/शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विहित करण्यात आलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते.


त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांचे नुकसान व शेतजमिनीचे नुकसान याकरिता मदतीचे वाटप करण्यासाठी एकूण रु.३५०१.७१ कोटी, रु.९८.५८ कोटी व रुपये ३३५.१७ कोटी इतका निधी वर नमूद अनुक्रमे दि.८.९.२०२२, दि. १४.९.२०२२ व दि. २८.०९.२०२२ च्या शासन निर्णयान्वये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात.

शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते.


अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळल्यास अशा नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून मदत देण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रस्ताव पाठविण्याची तरतुद आहे.

या तरतुदीनुसार चालू हंगामाध्ये विभागीय आयुक्त, औरंगाबाद व विभागीय आयुक्त, अमरावती व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे ३३ टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत शासनास प्रस्ताव प्राप्त झाले होते.

हे प्रस्ताव निर्णयार्थ मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि.२९ ०९.२०२२ रोजी झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. मंत्रिमंडळ उपसमितीने चालू हंगामाकरिता अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून विहित दराने मदत देण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


📃 म्हणूनच दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. तर तो शासन निर्णय सविस्तरपणे वाचण्यासाठी आणि कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर करण्यात आला आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.  👉👉 येथे क्लिक करा

तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटली असेल तर हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, खास करून तुमच्या व्हाट्सअप्प ग्रुपला हा लेख नक्की फॉरवर्ड करा. अशाच पोस्ट नेहमी वाचत राहण्यासाठी https://prajudigitalcenter.blogspot.com/ ह्या आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. धन्यवाद🙏

Post a Comment

0 Comments