Police Bharti 2022 : महाराष्ट्र पोलीस भरतीला हिरवा कंदील! 11 हजार 443 पदे भरली जाणार
222Police Bharti 2022 : कोरोना काळात राज्यातली पोलीस भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती.गेली दोन वर्ष कोणतीही पोलीस भरती पार पडली नव्हती.महाराष्ट्रातील लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत असतात.त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली असून सरकारने आता 11443 पदांसाठी पोलीस भरती 2022 (police bharti 2022) प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Police constables requirements Maharashtra
महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100 % पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण 11 हजार 443 पदे भरली जाणार आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50 % पदे भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई गट- क या संवर्गामध्ये 2021 मध्ये पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची 11 हजार 443 पदे रिक्त झाली होती.(Police constables requirements Maharashtra)
Maharashtra Police Barti 2022
सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100 % रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने दि. 27.9.2022 रोजीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मध्ये पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमारे 11443 इतकी पदे “Maharashtra Police Barti 2022” साठी उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र पोलीस भरती
शासन निर्णय येथे पहा
⇓
Police bharti 2022
वित्त विभाग तरतूदीनुसार पदभरतीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या असून यामध्ये सुधारीत आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत.अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50 % भरण्यास अनुमती देण्यात आली आहे.
पोलीस भरती वय मर्यादा | Police Bharti Age Limit
खुल्या प्रवर्गासाठी:
- पोलीस शिपाई : 18 वर्षे ते 28 वर्षे
- पोलीस शिपाई चालक : 19 वर्षे ते 28 वर्षे
- राज्य राखीव पोलीस दल : 18 ते 25 वर्षे
मागास प्रवर्गासाठी:
- पोलीस शिपाई : 18 वर्षे ते 33 वर्षे
- पोलीस शिपाई चालक : 19 वर्षे ते 33 वर्षे
- राज्य राखीव पोलीस दल : 18 ते 30 वर्षे
पोलीस भरती 2022 कागदपत्रे | Police bharti Documents
- दहावी,बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
- शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
- आधार कार्ड
- जातीचा दाखला (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
- नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
- लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
- चालक पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.
पोलीस भरती शारीरिक पात्रता | Police Bharti Physical Qualification
महिला : उंची – 155 cm पेक्षा कमी नसावी.
पुरुष : उंची – 165 पेक्षा कमी नसावी.
छाती न फुगवता 79 cm पेक्षा कमी – नसावी व फुगवून किमान 5cm ने फुगावी.
पोलीस भरती मैदानी चाचणी | Police bharti Ground
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी (Police bharti Ground) एकूण 50 होणार आहे.
पुरुष उमेदवार शारीरिक चाचणी
- 1600 मीटर धावणे (20 गुण)
- 100 मीटर धावणे (15 गुण)
- गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण
महिला उमेदवार शारीरिक चाचणी
- 800 मीटर धावणे (20 गुण)
- 100 मीटर धावणे (15 गुण)
- गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.
महाराष्ट्र पोलीस भरती
शासन निर्णय येथे पहा
⇓
Police bharti 2022
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील (SRPF) सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे.
- पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी.धावणे (50 गुण)
- 100 मीटर धावणे (25गुण)
- गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
पोलीस भरती अभ्यासक्रम | Police Bharti Syllabus
शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या चाचणीसाठी पात्र असतील.
लेखी चाचणीमध्ये खालील विषय समाविष्ट असतील.
1. अंकगणित
2. बुद्धिमत्ता
3. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
4. मराठी व्याकरण
लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल, लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे इतका असेल.उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे.लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र असमजण्यात येतील.
महाराष्ट्र पोलीस भरती
शासन निर्णय येथे पहा
⇓
Police bharti 2022
शेती व बाजारभाव सरकारी योजना शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !