Praju Digital

  • Praju Digital

Rules from 1st October : 1 ऑक्टोबर पासून देशात बदलणार हे नियम,लगेच पहा नाहीतर होईल नुकसान

 

Rules from 1st October : 1 ऑक्टोबर पासून देशात बदलणार हे नियम,लगेच पहा नाहीतर होईल नुकसान

Rules from 1st October

Rules from 1st October 2022 : आजपासून देशभरात अनेक नवीन नियम लागू होणार असून किंवा अनेक नियमात केले जाणार आहे,ज्यांचा परिणाम थेट सामान्य जनतेच्या खिशाला बसणार आहे.तर 1 ऑक्टोबर पासून कोणते नियम बदणार आणि त्याचा काय परिणाम होणार याची सविस्तर माहिती आज आपण पाहूया.

New Rules from 1st October 2022

गॅस सिलेंडर दरात होणार बदल 

LPG गॅस सिलेंडरच्या दरा संबधात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आढावा घेऊन सिलेंडरच्या किंमती ठरवल्या जातात. अशा परिस्थितीत कच्चा तेल आणि नैसर्गिक वायुच्या किमती कमी झाल्या आहेत.अशा परिस्थितीत सिलिंडर महाग आणि स्वस्तही असू शकतो. महत्त्वाची बाब अशी की वेगवेगळ्या राज्यांमध्ये करामुळे सिलिंडरची किंमतही वेगवेगळी असते.

आयकर भरणारे अटल पेन्शन योजनास अपात्र

एक ऑक्टोबर पासून आयकर भरणाऱ्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही.ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त आहे.त्यांना अटल पेन्शन योजनेअंतर्गत गुंतवणूक करता येणार नाही.सध्याच्या नियमानुसार 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिक सरकारच्या या पेन्शन योजनेत सामील होऊ शकतो.

Changes from 1st October

म्युच्युअल फंडामध्ये नामांकन आवश्यक

NES ने म्युच्युअल फंड मध्ये तसेच वारसदार नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नियम समितीकडून नवीन नियमानुसार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला एक ऑक्टोबर पासून नॉमिनीची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आणि ज्यांना नोंदणी करायची नाही,अशा गुंतवणूकदारांना एक घोषणा फॉर्म भरावा लागेल आणि नॉमिनीच्या सुविधेचा लाभ न घेण्याचे घोषित करावे लागणार आहे.

Demat Account Two Factor Authentication करणे आवश्यक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार खरेदी विक्री किंवा गुंतवणूक व्यवहार करतात अशा गुंतवणूकदारांचे डिमॅट अकाउंट असते. अनेक जण शेअर बाजारात व्यवहार करत असतात.आता डिमॅट अकाउंट धारकांसाठी Two Factor Authentication करणे सरकारने अनिवार्य केले आहे.डिमॅट अकाउंट धारकांसाठी 30 सप्टेंबर पर्यंत करणे आवश्यक होते.त्याशिवाय ग्राहकांना तुमचे डिमॅट खाते सुरू करता येणार नाही.

RBI Tokenisation Rule| क्रेडिट डेबिट कार्ड टोकनायझेशन

देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आजपासून महत्त्वाचे बदल करणार आहे.आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, हा नियम लागू झाल्यानंतर कार्डधारकांना अधिक सुविधा मिळणार आहे.

टोकनायझेशन म्हणजे काय?

आपण जेव्हा एखाद्या व्यवहारासाठी आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार आपल्याला 16-अंकी कार्ड क्रमांक,कार्डची मुदत,सीव्हीव्ही आणि ओटीपी नमूद करावा लागतो.जेव्हा ही सर्व माहिती योग्यरित्या भरली जाते तेव्हाच व्यवहार यशस्वी होतो.टोकनायझेशन कार्ड तपशील टोकन नावाच्या पर्यायी कोडमध्ये रूपांतरित करेल.हे टोकन कार्ड,टोकन विनंतीसाठी आणि डिव्हाइसवर अवलंबून असेल.

मुंबईत रिक्षा भाडे वाढले | Taxi Auto Fare Increase

एक ऑक्टोबरपासून मुंबईत टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात वाढ होणार आहे.टॅक्सीचे भाडे किमान तीन रुपयांनी वाढणार आहे,तर रिक्षाचे भाडे दोन रुपयांनी वाढणार आहे.रिक्षाचे किमान भाडे 25 रुपयांवरून आता 28 रुपये झाले आहे.

RBI ने वाढवला रेपो रेट

रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवला असून आता रेपो रेट 5.9% झाला आहे. हा दर वाढवल्यानंतर देशातील बहुतांश बँकांनी एफडी वरील व्याजामध्ये वाढ केली आहे.अशा स्थितीत आता पोस्ट ऑफिस,स्मॉल सेविंग स्कीम, सीनियर सिटीजन सेविंग स्कीम,सुकन्या समृद्धी योजनांची व्याजदर वाढू शकतात.पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांवर देखील 30 सप्टेंबर रोजी नवीन व्याजदर जाहीर केले आहेत.

PFRDA संदर्भात नवीन नियम

PFRDA ने अलीकडेच सरकारी आणि खाजगी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ई-नामांकन प्रक्रियेत बदल केला आहे.आजपासून नवीन NPS ई-नामांकन प्रक्रियेनुसार,नोडल ऑफिसरकडे NPS खातेधारकाची ई-नामांकन विनंती स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असेल.जर नोडल ऑफिसरने विनंतीवर 30 दिवसांच्या आत कोणताही निर्णय घेतला नाही तर, सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सीज (CRA) च्या प्रणालीमध्ये ई-नामांकन विनंती स्वीकारली जाणार आहे.

क्रिकेटमधील नियम बदलणार

क्रिकेट नियमांमध्येही 1 ऑक्टोबर पासून काही नवीन बदल केले आहेत.दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता लाळेच्या वापरावर कायमची बंदी घालण्यात आली आहे.
दुसऱ्या एका नियमानुसार फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवा फलंदाजच स्ट्राईकवर येणार आहे.यापूर्वीच्या नियमात झेलबाद होण्यापूर्वी फलंदाजाने जर क्रीझ सोडली असेल तर नॉन स्ट्राईकवरील फलंदाज स्ट्राईक घेऊ शकत होता.या नियमा आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबर पासून बदल झाला आहे.

शेती,राजकिय,क्रीडा,सरकारी योजना संदर्भात ताज्या महितीसाठी खाली दिलेला लिंक वर क्लिक करून व्हॉट्सॲप गृप नक्की जॉईन करा. ⇓

⇒ Join WhatsApp Group ⇐

Post a Comment

0 Comments